इतक कस चुकल?

काही वर्षानी तू मला हातात काठी घेउन चालताना दिसशील
तुझ्या चश्म्यामागच्या अंधुक नजरेतून मला निरखून पाहशील
ओळखून मला हसशील आणि डोळे तुडूंब भरून म्हणशील
.
.
अरे प्रशू मी तुला वेळीच का नाही रोखल? खरच रे माझ....इतक कस चुकल?
.
.
त्यावर मी म्हणेन . . .
" सोड ग. . . .जे झाल गेल गंगेला मिळाल "
पण जे तरुणपणी तुझ्या डोळ्यात नाही दिसल . . .
ते या वयात तुझ्या चश्म्यातून पाहायला मिळाल . . .

पण खरच ग तुझ....इतक कस चुकल? का तू मला वेळीच नाही रोखल?


-प्रशांत वालावलकर

नाही. . .

तुझा हाक जरी ऐकू आली,

तरी मी मागे वळून पाहणार नाही. . .

कितीही झाल तरी तुझ्यासाठी,

या डोळ्यात अश्रू आता साठणार नाही. . .
-प्रशांत वालावलकर

पापण्या

माझ्या समोरून जाताना,

तू डोळे खाली करून निघून जातेस . . .

आणि त्या डोळ्यांमधले प्रेम,

पापण्यांखाली लपवून जातेस . . .
-प्रशांत वालावलकर

साक्षीदार

ह्र्दयाचे ठोके सारखे वाटतात

पण प्रत्यक्षात तर नसतात...

आपल्या डोळ्यांनंतर तेच तर

प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असतात...
-प्रशांत वालावलकर

"मन उधाण ओळी....."

मन सागरास उधाण येता

कागदावर अलगद उतरतात ओळी

चारोळीतच ज्या गाठती किनारा

त्या असतात "मन उधाण ओळी....."
-प्रशांत वालावलकर

परत

माणस परत येत नसली

तरी आठवणी तर येतात..

ते दिवस परत येणार नसले

तरीही तारखा परत येतात...

-प्रशांत वालावलकर

हळू हळू

विसरून गेलोय आता पार तुला अस म्हणताना,

परत तुझीच आठवण काढतो आहे..

पण खरच हळू हळू का होईना,

मी तुला विसरतो आहे...

-प्रशांत वालावलकर