काळोख..

प्रेमाचे दोन थेंब ही, नाही पडले मजवरी कधी

मग तो भावनांचा गडगडाट नुसताच का केलास...?

जर कधी बेधूंद बरसायचे नव्हतेच मजवरी

मग मज जीवनी तो काळोख नुसताच का केलास...?
-प्रशांत वालावलकर

आठवणींचे पाणी......

अशी रात्र कधी-कधी, अधीमधी येते दाटून..
की मनावाटे डोळ्यात, पाउस येतो भरून......

बंद भावनांचे ढग, जे राहिलेले साठून..
मग कोसळती आठवणी, जणू जावे आभाळ फाटून......

प्रत्येक थेंब सांगत असतो, तीच जुनी कहाणी..
अन जखमांच्या छिद्रातून आत झिरपू लागते पाणी......

मनाच्या घट्ट नावेला ही, आता होत असते हानी..
असे काही उधाण असते, हे "आठवणींचे पाणी"......

-प्रशांत वालावलकर