आठवणींचे पाणी......

अशी रात्र कधी-कधी, अधीमधी येते दाटून..
की मनावाटे डोळ्यात, पाउस येतो भरून......

बंद भावनांचे ढग, जे राहिलेले साठून..
मग कोसळती आठवणी, जणू जावे आभाळ फाटून......

प्रत्येक थेंब सांगत असतो, तीच जुनी कहाणी..
अन जखमांच्या छिद्रातून आत झिरपू लागते पाणी......

मनाच्या घट्ट नावेला ही, आता होत असते हानी..
असे काही उधाण असते, हे "आठवणींचे पाणी"......

-प्रशांत वालावलकर

1 comment:

Aata-Tari-Bol said...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

आठवण फ्क्त तुलाच होते असे नाही,
तिच्या पापण्यात देखील थेंब साठत असतील काही•·

तुझ्या कडे आहे संत वारा,
तिच्या अडचणीत मुसळधार गारा•·

तुझ्या कडे आहे ह्या पाण्याच्या धारा,
पण ती तर सोसतेय पावसंचा मारा•·

तू स्वतःचा विचार करून तिला विसरतोय,
आणि मागे तिच्या आठवणीत पाणी गाळतोय•·

दुख तिला तेवढच आहे जेवढ तुला,
ह्या आठवनीच्या पाण्यात सावर स्वता:ला•·

तिच्या जवळ जा,तिचा हात धर,
तिच्या सोबत,तू जुन्या आठवणीना स्मर•·

मग कळेल दोघंना,काय चुक आहे,
मैत्रीत एकमेकांची तितकीच गरज आहे•·

मग वाटेल एकमेकन कसे विसरू,
आणि मग बहरतील ह्या पापण्यातूनच आनंदअश्रू•·

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●