मन वेडेपिसे. . .
Email This
BlogThis!
Share to X
Share to Facebook
Share to Pinterest
मनात राहिले सारे.... जे मनात पाहिले सारे
आजही मनात उठतात प्रेम ज्वाळा, अन् मन-मनीच वाहतात प्रेम वारे
तुझ्या शिवाय कुणी आले नव्हते असे. . . . . . त्यापूर्वी कधी ना त्यानंतर कधी
मन माझे नव्हते इतके वेडेपिसे. . . .
त्यापूर्वी
कधी
ना
त्या
नंतर
कधी.
. . .
-प्रशांत वालावलकर
आज पुन्हा . . .
Email This
BlogThis!
Share to X
Share to Facebook
Share to Pinterest
तिचीच आठवण आज पुन्हा
तिचाच चेहरा डोळ्यात पुन्हा
आज गवसली तिची आठवण नवी,
ती भेटली अनपेक्षित आज पुन्हा . . .
समोर उभी ती आज पुन्हा,
तशीच हसरी आज पुन्हा,
हसत निरोप दिला तिस
अन् डोळ्यात भरून घेतले आज पुन्हा . . .
ती आज ही तसेच बोलते,
जणू काही कधी घडलेच नव्हते
समोर येते ते एकच सत्य. . .
मीच वेडा तिच्याविण सुना
क्षणात विसरली ही असेल ती मज . . . आज पुन्हा . . . आज पुन्हा . . . आज
पुन्हा
-प्रशांत वालावलकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)