आज पुन्हा . . .

तिचीच आठवण आज पुन्हा
तिचाच चेहरा डोळ्यात पुन्हा
आज गवसली तिची आठवण नवी,
ती भेटली अनपेक्षित आज पुन्हा . . .

समोर उभी ती आज पुन्हा,
तशीच हसरी आज पुन्हा,
हसत निरोप दिला तिस
अन् डोळ्यात भरून घेतले आज पुन्हा . . .

ती आज ही तसेच बोलते,
जणू काही कधी घडलेच नव्हते

समोर येते ते एकच सत्य. . .
मीच वेडा तिच्याविण सुना
क्षणात विसरली ही असेल ती मज . . . आज पुन्हा . . . आज पुन्हा . . . आज पुन्हा

-प्रशांत वालावलकर

1 comment:

Aata-Tari-Bol said...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
कितीही झाल तरी तू विसरणार नाहीस,
तिची आठवण काढशिल आज पुन्हा ●●•٠·

हृदय केलस कठोर,पण झाली काही इजा तिला,
तरी तडपेल तुझा जीव आज पुन्हा ●●•٠·

हसतोस आणि गांभीर्य लपावतोस,
जगाच्या कोपर्‍यात जाउन एकटाच रडतोस,
तिची आठवण आली की आज पुन्हा ●●•٠·

पुरे झाले आता सोड तिची आठवण,
आणि कर आता कोण्या सुंदर जीवाची साठवन ●●•٠·

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●