उगाचच...

काही स्वप्न उगाचच पहायची असतात
त्यात उगाचच रमायच देखील असत
उगाचच कल्पनेच्या सुरेख तलावात मनसोक्त पोहायच असत
अन् अघटीत प्रत्यक्षाला अप्रत्यक्ष अनुभवायचं असत...

खरंच... स्वप्नांच  भाव विश्व खरंच किती सुंदर असत.....

           " न भेटू शकणारी गोष्ट देखील, बंद डोळ्यांआड दिसून जाते...
           आणि कधी आसपास नसणारी व्यक्ती सुद्धा, हळूच मिठीत विसावून जाते..." :-)



-प्रशांत वालावलकर

मन उधाण वादळाचे. . .

आज एक वादळ उठलंय . . . उद्या उद्ध्वस्त करेल . . .
कुणी आहे का?
.
.
.
कुणी आहे का? . . . त्या वादळाशी लढायच बळ देणारं. . .
त्या वादळात माझा हात घट्ट धरून राहणारं. .

आज खरच खूप एकट वाटतय . . .
आयुष्य एका नाजूक वळणावर, भरकटल्या सारख वाटतय. . .
माझ्या स्वप्नांचा पालोपाचोळा होतो की काय ? . . . सतत इतकच वाटतय . . .
मुळासकट उपटला जाईन की काय?. . . .सतत मन धास्तावतंय . . . .

सतत विचारांच्या वादळाने मन उधाणून येतंय. . .
कुणास ठाऊक कुठे . . . हे वादळ मला घेऊन जातंय. . .

हे वादळ माझा अंत नाही, पण रोज मरण यातना मात्र देईल. . .
पण एकदा माझी "आस" संपली कि "श्वास" हि घेऊन जाईल. . .

क्षणाक्षणाला जळतो आहे श्वास माझा, जळते माझी कातं
वादळाशी लढल्याशिवाय, नाही विझणार जीवन वातं
करीन तुझ्याशी वादळा मी, पुरते दोन हातं
जरी एकटा मी, नाही कुणाची साथं. . .

एकटाच मी. . .. या " मन उधाण वादळातं ". . .

-प्रशांत वालावलकर

मन वेडेपिसे. . .

मनात राहिले सारे.... जे मनात पाहिले सारे

आजही मनात उठतात प्रेम ज्वाळा, अन् मन-मनीच वाहतात प्रेम वारे

तुझ्या शिवाय कुणी आले नव्हते असे. . . . . . त्यापूर्वी कधी ना त्यानंतर कधी

मन माझे नव्हते इतके वेडेपिसे. . . . त्यापूर्वी कधी ना त्या नंतर कधी. . . .

-प्रशांत वालावलकर

आज पुन्हा . . .

तिचीच आठवण आज पुन्हा
तिचाच चेहरा डोळ्यात पुन्हा
आज गवसली तिची आठवण नवी,
ती भेटली अनपेक्षित आज पुन्हा . . .

समोर उभी ती आज पुन्हा,
तशीच हसरी आज पुन्हा,
हसत निरोप दिला तिस
अन् डोळ्यात भरून घेतले आज पुन्हा . . .

ती आज ही तसेच बोलते,
जणू काही कधी घडलेच नव्हते

समोर येते ते एकच सत्य. . .
मीच वेडा तिच्याविण सुना
क्षणात विसरली ही असेल ती मज . . . आज पुन्हा . . . आज पुन्हा . . . आज पुन्हा

-प्रशांत वालावलकर

काळोख..

प्रेमाचे दोन थेंब ही, नाही पडले मजवरी कधी

मग तो भावनांचा गडगडाट नुसताच का केलास...?

जर कधी बेधूंद बरसायचे नव्हतेच मजवरी

मग मज जीवनी तो काळोख नुसताच का केलास...?
-प्रशांत वालावलकर

आठवणींचे पाणी......

अशी रात्र कधी-कधी, अधीमधी येते दाटून..
की मनावाटे डोळ्यात, पाउस येतो भरून......

बंद भावनांचे ढग, जे राहिलेले साठून..
मग कोसळती आठवणी, जणू जावे आभाळ फाटून......

प्रत्येक थेंब सांगत असतो, तीच जुनी कहाणी..
अन जखमांच्या छिद्रातून आत झिरपू लागते पाणी......

मनाच्या घट्ट नावेला ही, आता होत असते हानी..
असे काही उधाण असते, हे "आठवणींचे पाणी"......

-प्रशांत वालावलकर

सक्त मनाई

आधी तुझी आठवण भरधाव यायची . . . .
मेंदू मार्गे थेट काळजात घूसायची . . . !

पण आता तीला ही येण्यासाठी, मोकळी वाट शोधावी लागते आहे . . .
जेव्हा येऊ पहाते माझे काळीज म्हणते . . .

"सॉरी.....आता तुला येथे सक्त मनाई आहे"
-प्रशांत वालावलकर

ओलेचिंब भास . . .

पावसाचा थेंब पडला गालावरी,
भासला तो मला तुझ्या स्पर्शापरी. . .
वारा आला अन त्या थेंबास पुसून गेला,
भासला तो मला तुझ्या ओठांपरी. . .

कोसळू लागला पाउस जोरात,
विज कडाडली अन शहारा पूर्ण अंगात. . .
या पावसात तू भासली मला मज मिठीत,
अन मी चिंब भिजलो तुझ्या स्पर्शात. . .

असे तुझे अनेक भास होती मजला,
या ओल्याचिंब दिवसात . . .
-प्रशांत वालावलकर

ओल्याचिंब "मन उधाण ओळी"

थेंबातून बरसले शब्द

ते साचले अन् झाल्या ओळी

या पावसात ओल्याचिंब

माझ्या "मन उधाण ओळी"....
-प्रशांत वालावलकर

पहिला पाउस...

पावसात मी होतो...एकटा ओलाचिम्ब,

तुझी आठवण करून देत होता...प्रत्येक थेंब न थेंब

मग थोड़ उभ राहून आडोशाला ...सावरल मनाला

नंतर जाऊन सामोर...अनुभवल ख-या पावसाला

-प्रशांत वालावलकर