काळोख..

प्रेमाचे दोन थेंब ही, नाही पडले मजवरी कधी

मग तो भावनांचा गडगडाट नुसताच का केलास...?

जर कधी बेधूंद बरसायचे नव्हतेच मजवरी

मग मज जीवनी तो काळोख नुसताच का केलास...?
-प्रशांत वालावलकर

आठवणींचे पाणी......

अशी रात्र कधी-कधी, अधीमधी येते दाटून..
की मनावाटे डोळ्यात, पाउस येतो भरून......

बंद भावनांचे ढग, जे राहिलेले साठून..
मग कोसळती आठवणी, जणू जावे आभाळ फाटून......

प्रत्येक थेंब सांगत असतो, तीच जुनी कहाणी..
अन जखमांच्या छिद्रातून आत झिरपू लागते पाणी......

मनाच्या घट्ट नावेला ही, आता होत असते हानी..
असे काही उधाण असते, हे "आठवणींचे पाणी"......

-प्रशांत वालावलकर

सक्त मनाई

आधी तुझी आठवण भरधाव यायची . . . .
मेंदू मार्गे थेट काळजात घूसायची . . . !

पण आता तीला ही येण्यासाठी, मोकळी वाट शोधावी लागते आहे . . .
जेव्हा येऊ पहाते माझे काळीज म्हणते . . .

"सॉरी.....आता तुला येथे सक्त मनाई आहे"
-प्रशांत वालावलकर

ओलेचिंब भास . . .

पावसाचा थेंब पडला गालावरी,
भासला तो मला तुझ्या स्पर्शापरी. . .
वारा आला अन त्या थेंबास पुसून गेला,
भासला तो मला तुझ्या ओठांपरी. . .

कोसळू लागला पाउस जोरात,
विज कडाडली अन शहारा पूर्ण अंगात. . .
या पावसात तू भासली मला मज मिठीत,
अन मी चिंब भिजलो तुझ्या स्पर्शात. . .

असे तुझे अनेक भास होती मजला,
या ओल्याचिंब दिवसात . . .
-प्रशांत वालावलकर

ओल्याचिंब "मन उधाण ओळी"

थेंबातून बरसले शब्द

ते साचले अन् झाल्या ओळी

या पावसात ओल्याचिंब

माझ्या "मन उधाण ओळी"....
-प्रशांत वालावलकर

पहिला पाउस...

पावसात मी होतो...एकटा ओलाचिम्ब,

तुझी आठवण करून देत होता...प्रत्येक थेंब न थेंब

मग थोड़ उभ राहून आडोशाला ...सावरल मनाला

नंतर जाऊन सामोर...अनुभवल ख-या पावसाला

-प्रशांत वालावलकर

प्रेमाच्या नात्याची Reciepe..

एक वाटी विश्वास आणि मूठभर सहवास

समजूतदार पणाची झक्कास फोडणी

त्यावर मैत्रीच साजूक तूप

आणि चिमुटभर प्रेमाची मनसोक्त भूरभुर
-प्रशांत वालावलकर

इतक कस चुकल?

काही वर्षानी तू मला हातात काठी घेउन चालताना दिसशील
तुझ्या चश्म्यामागच्या अंधुक नजरेतून मला निरखून पाहशील
ओळखून मला हसशील आणि डोळे तुडूंब भरून म्हणशील
.
.
अरे प्रशू मी तुला वेळीच का नाही रोखल? खरच रे माझ....इतक कस चुकल?
.
.
त्यावर मी म्हणेन . . .
" सोड ग. . . .जे झाल गेल गंगेला मिळाल "
पण जे तरुणपणी तुझ्या डोळ्यात नाही दिसल . . .
ते या वयात तुझ्या चश्म्यातून पाहायला मिळाल . . .

पण खरच ग तुझ....इतक कस चुकल? का तू मला वेळीच नाही रोखल?


-प्रशांत वालावलकर

नाही. . .

तुझा हाक जरी ऐकू आली,

तरी मी मागे वळून पाहणार नाही. . .

कितीही झाल तरी तुझ्यासाठी,

या डोळ्यात अश्रू आता साठणार नाही. . .
-प्रशांत वालावलकर

पापण्या

माझ्या समोरून जाताना,

तू डोळे खाली करून निघून जातेस . . .

आणि त्या डोळ्यांमधले प्रेम,

पापण्यांखाली लपवून जातेस . . .
-प्रशांत वालावलकर

साक्षीदार

ह्र्दयाचे ठोके सारखे वाटतात

पण प्रत्यक्षात तर नसतात...

आपल्या डोळ्यांनंतर तेच तर

प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असतात...
-प्रशांत वालावलकर

"मन उधाण ओळी....."

मन सागरास उधाण येता

कागदावर अलगद उतरतात ओळी

चारोळीतच ज्या गाठती किनारा

त्या असतात "मन उधाण ओळी....."
-प्रशांत वालावलकर

परत

माणस परत येत नसली

तरी आठवणी तर येतात..

ते दिवस परत येणार नसले

तरीही तारखा परत येतात...

-प्रशांत वालावलकर

हळू हळू

विसरून गेलोय आता पार तुला अस म्हणताना,

परत तुझीच आठवण काढतो आहे..

पण खरच हळू हळू का होईना,

मी तुला विसरतो आहे...

-प्रशांत वालावलकर